Homeताज्या बातम्या

बाळनाथ गडावर २०० देशी वृक्षांचे रोपण; ‘नगरी फॉर नेचर’ आणि ‘डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक सहाय्यता ग्रुप’ चा उपक्रम

अहिल्यानगर : तालुक्यातील बाळनाथ गड येथे वै.ह.भ.प.संतचरणरज छगन महाराज मालुसरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘नगरी फॉर नेचर’ आणि ‘डॉ. अब्दुल कलाम शैक्षण

नेपाळमधून हरवलेला युवक उपचारानंतर सुखरूप कुटुंबात दाखल
राजकीय वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; देवळाली प्रवरा येथे सत्तूर-लोखंडी रॉडने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान

अहिल्यानगर : तालुक्यातील बाळनाथ गड येथे वै.ह.भ.प.संतचरणरज छगन महाराज मालुसरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘नगरी फॉर नेचर’ आणि ‘डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक सहाय्यता ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वड, पिंपळ, कडुनिंब आणि उंबर या देशी वृक्षांच्या बाळनाथ गड येथे १२५, तर शेंडी येथे ७५, अशा एकूण २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. देशी वृक्षांचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरण समृद्ध ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही घेण्यात आली. या उपक्रमामुळे बाळनाथ गड व परिसराच्या सौंदर्यात तसेच पर्यावरणीय समृद्धीत भर पडणार आहे. या उपक्रमात ग्रामीण आरोग्य अधिकारी डॉ. सचिन दरंदले, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी उबरहांडे, धर्मराज गुंड, विद्या गुंड, महेश कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी, शिव माचवे, माया माचवे, सुप्रिया टेमकर, उद्धवराज टेमकर, मंजुषा दिवसे, प्रिया उबरहांडे, राजेश उदमले, विशाल पांचारिया, महेश शिंदे, अर्चना शिंदे, अजय पासलकर, सचिन म्हस्के,प्रा.विजय कांडके, प्राचार्य दानवे,उपसरपंच गणेश सानप, युवासेना जिल्हा उपप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य सोमनाथ कांडके, वनरक्षक बाबासाहेब बडेकर, शिवम घोरपडे, ओम कांडके,अविराज कांडके यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी व यशस्वीतेसाठी प्रा. विजय कांडके यांनी सहकार्य केले, तर ‘डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक सहाय्यता ग्रुप’च्या वतीने उद्धवराज टेमकर व सर्व टिम यांनी उपक्रमाच्या नियोजन व समन्वयाची भूमिका पार पाडली. प्राचार्य दानवे (मराठवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी आलेल्या २० विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

COMMENTS