Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत. मात्र, त्यांचा या मागील हे

सैनिक स्कूलच्या प्रवेश पात्रता परीक्षेत कुडाळ शाळेचे आठ विद्यार्थी यशस्वी
भारताच्या अडचणी वाढल्या ; ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त
ओबीसींच्या न्यायहक्कासाठी आ. गोरे यांना वंचित बहुजन आघाडीने मागितला राजीनामा

इस्लामपूर / प्रतिनिधी : हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत. मात्र, त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील इफ्तार पार्टीत बोलताना व्यक्त केला.
इस्लामपूर येथील ख्वाजा गरीब नवाज सोशल ट्रस्टच्या वतीने मुस्लिम मोहल्ला येथे रोझा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी प्रामुख्याने उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, आपण वर्तमान पत्र व टी. व्ही. चॅनेलवरून राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण वाचत असाल, पहात असाल. काही मंडळी हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करत आहेत. या मंडळींचा हेतू शुध्द नाही. त्यांना यातून समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, राज्यातील सुज्ञ जनता या मंडळींचा हा डाव हाणून पडतील. ज्यांची केंद्रात सत्ता आहे. जे राज्यात सत्ता घेण्यासाठी अस्वस्थ आहेत. ती मंडळी राज्यास बदनाम करून राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण करत आहेत. यावेळी त्यांनी येणार्‍या रमजानच्या व रोझा सोडण्यास शुभेच्छा दिल्या.

COMMENTS