Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती : ना. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपाच्या केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती

ढाकणी येथे अज्ञात बोलेरोच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू
महिला राष्ट्रवादीतर्फे मोटार सायकल रॅली काढून नारी शक्तीचे दर्शन
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपाच्या केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती. त्यातून देशातील शेतकर्‍यांचे प्रसमोर आले असते. मात्र, भाजपाचे केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याने त्यांनी तशी चर्चा केली नाही, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी साखराळे येथे बोलताना केला. पक्षाच्या गांव बैठकीमध्ये विविध प्रश्‍नावर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. ग्रामस्थांशी संवाद व संपर्क व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
साखराळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवा दलाच्या गांव बैठकीमध्ये ते बोलत होते. ना. पाटील यांनी खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त’ एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी’ हा संपूर्ण राज्यासाठी उपक्रम दिला आहे. त्यांनी स्वतः साखराळे गावात दुसरी बैठक घेवून कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी सभापती आनंदराव पाटील, सेवा दलाचे साखराळे अध्यक्ष अविनाश पाटील, पं. स. सदस्या रंजना माने, महिलांच्या जिल्हा उपाध्यक्षा अलका माने, साखराळे अध्यक्षा लताताई धज युवकांचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख, साखराळे अध्यक्ष सुशील पाटील उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, शेतकरी आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले. भाजपाला पंजाबमध्ये फिरणे मुश्कील झाले आहे. तिथे काँग्रेसला बळ मिळेल. आप वाढणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांच्या मुलाने शेतकर्‍यांना चिरडले. तिथेही शेतकर्‍यांचा मोठा रोष आहे. काही दिवसापूर्वी हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने ऑनलाईन परीक्षेसाठी 10 वी-12 वीच्या विद्यार्थांना जी फूस लावली. ती राज्य सरकार विरोधी भडकविण्याचा डाव आहे. ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थांनी कितीही गुण मिळविले. तरी त्याचे महत्व कमी राहून मुलांना नोकर्‍या मिळताना अडचणी येवू शकतात. त्यामुळे राज्य सरकारने ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ संकल्पात सामान्य माणूस, नोकरांना नव्हे तर मोठ्या उद्योगपतींना कार्पोरेट टॅक्समध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. मात्र, देशवासियांना तोषिश लावणार्‍या खाजगीकरणास आमचा विरोध आहे. ग्रामपंचायतमध्ये स्विकृत सदस्य घेण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. साखराळेच्या विठ्ठल मंदिरसाठी 25/15 मधून 25 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष अलका माने यांनी राष्ट्रवादी हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष असून महिलांनी अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. माजी सभापती शैलेंद्र सूर्यवंशी यांनी बंडातात्या कराडकर यांचा निषेध केला. युवकचे तालुका सरचिटणीस विनोद बाबर यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडताना रासायनिक दर वाढीबद्दल असंतोष व्यक्त केला. महिलांच्या साखराळे अध्यक्षा लताताई धज यांनी गॅस सिलेंडरच्या दर वाढीने महिला वर्ग त्रस्त असल्याचे सांगितले. युवक राष्ट्रवादीचे साखराळे अध्यक्ष सुशील पाटील यांनी शासनाच्या ऑफ लाईन परिक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. चंद्रकांत पाटील यांनी युवकांच्यासाठी कार्यशाळा व ग्रामपंचायतीमध्ये स्विकृत सदस्य घेण्याची सूचना केली. धरणग्रस्तांचे युवक कार्यकर्ते वसंत जाधव यांनी धारणग्रस्तांचे प्रश्‍न मांडत सभागृहाची मागणी केली. राजेंद्र पाटील, अरुण माळी, अनिता पवार यांचीही भाषणे झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन वीरकर, युवक कार्यकर्ता ऋतुराज धज यांच्या भाषणाचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी सेवा दलाचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच बाबुराव पाटील, सुबराव डांगे, भास्करराव पाटील, शिवाजी डांगे, आनंदराव दवणे, पी. बी. सुर्वे, शशिकांत पाटील, सुनील पाटील, बाबासो डांगे, उमेश रासनकर, रामराजे पाटील यांच्यासह गावातील पक्षाचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच तजमुल चौगुले यांनी आभार मानले. राजाभाऊ चिवटे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS