Homeताज्या बातम्या

माऊली विद्यालय व आदर्श बालवाडीत गुरुपौर्णिमा साजरी; जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम विजेती आरोही घोलपचा सत्कार

बीड: येथील माऊली विद्यालय व आदर्श बालवाडीत २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या प्र

शालेय पोषण आहाराला गॅस टंचाईची झळ; ग्रामीण भागातील शाळांमध्ये चुलीवर स्वयंपाक
आषाढी एकादशीपूर्वीच पंढरपुरात भाविकांचा महापूर; विठ्ठल दर्शनाची रांग ८ किलोमीटरवर, प्रसादासाठी १२ लाख लाडू सज्ज!
पातळगंगेचे पाणी दूषित; दुर्गंधीने वाढली आरोग्याची चिंता! पाणी स्वच्छ होईपर्यंत स्विमिंग टाळा: डॉ. मुंडे, डॉ. भुमे

बीड: येथील माऊली विद्यालय व आदर्श बालवाडीत २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सरस्वती विद्यामंदिर आयोजित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून १,५०१ रुपयांचे रोख पारितोषिक पटकावणारी विद्यार्थिनी आरोही घोलप हिचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मंथन स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणारे तेजश्री कदम, धनश्री गायकवाड आणि निर्मिक गवळी यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय दैनिक लोकमत आयोजित ’-ख ची दुनिया’ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर सहशिक्षिका वंदना आवाड तसेच शिक्षक रमाकांत डोळस, दिलीप साखरे आणि मुख्याध्यापक संतोष माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्वरा माने व सिद्धी उगले यांनी केले. अखेरीस पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS