माजलगाव: दशनाम गोसावी समाज परिषद (बीड), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री. ज्ञानेश्वर महादेव गिरी यांची राज्य युवा कार्याध्यक्ष या महत्त्वपूर्ण

माजलगाव: दशनाम गोसावी समाज परिषद (बीड), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री. ज्ञानेश्वर महादेव गिरी यांची राज्य युवा कार्याध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
समाजातील युवकांना संघटित करून समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणे, सामाजिक ऐक्य अधिक दृढ करणे, समाजाचा सांस्कृतिक वारसा जपणे तसेच सक्षम आणि प्रभावी युवा नेतृत्व घडविणे या उद्दिष्टांसाठी श्री. गिरी यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
श्री. ज्ञानेश्वर महादेव गिरी यांच्या निवडीमुळे समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, समाजकार्याला अधिक गती मिळेल आणि संघटना अधिक सक्षम व बळकट होईल, असा विश्वास समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल दशनाम गोसावी समाज परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी श्री. ज्ञानेश्वर महादेव गिरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS