Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण प्रकरणाबाबत माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना पोलीस विभागामार्फत जारी

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. 345/2025भारतीय न्याय संहित्ता 64 (2) इत्यादी प्रमाणे दि. 24/10/2025 रोज

कराड शहरातील थकबाकीदार आता झळकणार फ्लेक्सवर
लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन
प्रकाश हॉस्पिटलवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना : निशिकांत पाटील

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. 345/2025भारतीय न्याय संहित्ता 64 (2) इत्यादी प्रमाणे दि. 24/10/2025 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांमध्ये 1) गोपाळ बाळासाहेच बदने, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे 2) प्रशांत किसन बनकर वय 29 वर्ष रा. फलटण हे आरोपी असून यामध्ये मयत पिडीत महिला आहे.
हा गुन्हा अत्यंत संवदेनशिल आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यातील पिडीत व्यक्तीचे नाव पत्ता अथवा त्या व्यक्तीची ओळख उघड होईल अशा प्रकारची कोणत्याही माहितीचा समावेश आपल्या बातमीमध्ये किंवा महिती पत्रामध्ये असणार नाही याची दक्षता घ्यावी व संवेदनशीलता जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सदर गुन्ह्याच्या तपासाची प्रक्रिया सुरु असल्याने गुन्ह्याच्या तपासाच्या बाबत कोणताही विपर्यास निर्माण करणारी, तथ्यहिन माहिती बातमी प्रसारित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पिडीत व्यक्ती अथवा अन्य संबधीत कोणत्याही व्यक्तींचे चारित्र्यहनन करणारी किंवा चारित्र्याबद्दल संशय निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे ही आपली वैयक्तीक जबाबदारी असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या घटनेबाबत दिली जाणारी सार्वजनिक बातमी / माहिती / दृश्ये हि कायद्याच्या मर्यादेत असणे बंधनकारक आहे. कायद्याचे कोणतेही उल्लंघन होवून प्रसारित झाल्यास आपण भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 72 (आयपीसी 228 अ), भारतीय राज्य घटनेचे कलम 21 तसेच द डिजिटल परर्सनल डाटा प्रोटेक्शन अ‍ॅक्ट 2023 मधील तरतुदीचे उल्लंघन होवून आपण गुन्हेगारी कृत्यास पात्र ठरतो याची जाणीव असावी, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कळविले आहे.

COMMENTS