’समाज’ नष्ट होतोय का ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

’समाज’ नष्ट होतोय का ?

समाज ही एक व्यापक संज्ञा आहे. देश, प्रांत, धर्म, लिंग, जात या भेदांच्या पलिकडे जाऊन समाज ही संज्ञा आपण पाहतो. समाजशास्त्रात याच्या अनेक व्याख्या समाज

सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव
स्मशानभूमीतील ती लोखंडी जाळीही चोरट्यांनी चोरली
विनायक प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी

समाज ही एक व्यापक संज्ञा आहे. देश, प्रांत, धर्म, लिंग, जात या भेदांच्या पलिकडे जाऊन समाज ही संज्ञा आपण पाहतो. समाजशास्त्रात याच्या अनेक व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी केल्या आहेत. मात्र, समाज या संज्ञेची एक सोपी व्याख्या आम्ही करतो ती म्हणजे, ’ सामाजिक नियमांनी नियमन होणारा मानवी समुह म्हणजे समाज!’ जगातील कोणताही समाज हा त्या त्या समाजाचे अलिखित आणि सांस्कृतिक बंधनांच्या नियमांनी बंदिस्त असतो. हे नियम पालन करणे ही परंपरा होवून स्थितीशील होते तेव्हा त्यात बदल करण्याची गरज असते. बदल स्विकारणे स्थितीशील समाजाला नको असते. तेव्हा परंपरा आणि आधुनिक मूल्य यांच्यात संघर्ष उभा राहतो. या संघर्षात चांगले बदल काळाच्या ओघात स्विकारले जातात. यालाच आपण पुरोगामी बदल म्हणतो. मात्र, तरीही, जगातील कोणत्याही समाजात काही बाबी नितीमूल्यांच्या आधारावर कायम असतात. ज्यात स्त्रियांचा सन्मान, त्यांच्याविषयी चांगले वागणे-बोलणे. त्यांना सुरक्षित वाटेल असं सामाजिक वातावरण कायम ठेवणे. मात्र, यास काही संस्कृती या अपवाद असतातच. सध्या मुस्लिम महिलांचा लिलाव करण्याची जाहीरात करणारे बुली-बाई आणि सुल्ली या ऍप च्या माध्यमातून भयावह षडयंत्र समोर आलं आहे. जीवनाच्या उत्तुंग अशा शिखरावर गेलेल्या मुस्लिम महिलांची बदनामी करणार्‍या या ऍपचे प्रकरण गेल्या जुलैमध्ये उघडकीस आले होते. त्याचवेळी त्याविरोधात काही मुस्लिम महिलांनी एफआयआर देखील नोंदले. परंतु, दिल्ली पोलिसांसह देशभरातील पोलिस यंत्रणा याप्रकरणी कोणताही तपास करायला तयार झाले नाहीत. भारतीय समाज म्हणून स्त्रीयांचा सन्मान राखला जावा, असं या यंत्रणांना वाटलं नाही का? हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. या ऍपच्या संदर्भात तीन जणांना आता ताब्यात घेण्याची जी कारवाई होतेय ती देखील थक्क करणारी आहे. कारण यातील जे तीन जण आहेत, त्यात एका तरूणीचाही समावेश आहे. या तरूणीविषयी कालच माध्यमातून बोलताना प्रसिद्ध सिनेकथा आणि गितकार जावेद अख्तर यांनी त्या तरूणीला माफ करावं असं विधान केले होते. अख्तर यांनी मानवतेच्या भावनेतून ते विधान केले आहे. परंतु, ती तरूणी आणि इतर दोघे यांच्या नावातून एक साम्यता अशी लक्षात येते की, हे तिघे जातव्यवस्थेतील उच्चजातीय आहेत. सध्या देशात जे जातीय ध्रृविकरण केले जात आहे, त्याच्याशी समन्वय राखणारा हा भाग दिसतो. म्हणजे देशात धर्मद्वेषाची जी लाट उभी केली जात आहे, त्याचा अनन्यसाधारण असा परिणाम आहे. जर हे प्रकरण सात ते आठ महिन्यांपूर्वी उघड झाले, त्याविरोधात रितसर तक्रारी नोंदवून देखील त्याविरोधात कारवाई करण्यास न धजावलेली पोलिस यंत्रणा समाज नष्ट करू इच्छित आहे काय? पोलिसांचे असे वर्तन सत्तापक्ष हा कोणत्या सांस्कृतिक धाटणीचा आहे, यावरून ठरत असेल तर ते आणखीनच भयावह म्हणावे लागेल. आपण समाज म्हणून भारतीय आहोत. संस्कृती ही धर्म किंवा जातीची नसते. ती देशाची असतें. आज भारतीयांची लग्नं आपण पाहतो; धर्म-जात कोणतीही असली तरी लग्नाचे रितीरिवाज हळद लावण्यापासून तर लग्न लागेपर्यंत सारखेच. फक्त लग्नातील विधीत थोडाफार फरक असेल. हळद, टाळी, जेवणावळी हे सारखंच. भारतीय समाजात स्त्रीचा सन्मान गौरवलेला. फक्त संस्कृती ही अपवाद आहे की, स्त्रीयांना बडवण्याचं साधन मानते. त्यामुळे, स्त्रियांना अशा प्रकारे लिलावात काढणारे ऍप, ते बनवून ऍप्लाय करणारे उच्चजातीय तरूण-तरूणी आणि त्यावर काही ऍक्शन न घेणारे दिल्ली पोलिस हे सर्व षडयंत्र असं वाटते की, समाज म्हणजे समाजाची मानवीय संस्कृती नष्ट करण्याचाच हा प्रकार आहे काय? तसं असेल तर याप्रकरणी गंभीर कारवाईस टाळाटाळ करणार्‍यांना देखील चौकशीच्या कक्षेत आणायला हवे.

COMMENTS