Homeताज्या बातम्या

मुळा उजवा कालव्याच्या रोटेशनसाठी पालकमंत्री विखेंना साकडे

शहरटाकळी : मुळा उजवा कालव्याचे अतिरिक्त पाणी रोटेशन वेळेवर मिळावे तसेच शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठ

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल शनिचरणी
बालमटाकळीत 950 मीटर लांबीच्या बंधाऱ्याची कामे पूर्ण
बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण

शहरटाकळी : मुळा उजवा कालव्याचे अतिरिक्त पाणी रोटेशन वेळेवर मिळावे तसेच शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, आमदार अक्षय कर्डिले, तालुका सरचिटणीस सुभाषराव बरबडे तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल भाऊ सुपेकर यांनी मुळा उजवा कालव्याचे अतिरिक्त पाणी रोटेशनबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी व मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. सध्या पावसाचे प्रमाण, खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुळा धरण ९०% भरले असल्याने अतिरिक्त पाणी मुळा उजवा कालव्याचे योग्य पाणी नियोजन करून वेळेत सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कालव्याच्या पाणी रोटेशनमध्ये योग्य नियोजन करून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देण्याबाबतही चर्चा झाली. “शेतकरी हा केंद्रबिंदू मानून पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. मुळा उजवा कालव्याच्या पाणी रोटेशनचा प्रश्न मार्गी लागून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू,” अशी भूमिका यावेळी सुभाषराव बरबडे व अनिल भाऊ सुपेकर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एकत्रितपणे पाठपुरावा करत असल्याने मुळा उजवा कालव्याच्या पाणी रोटेशनचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

COMMENTS