Homeताज्या बातम्या

बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

अहिल्यानगर : पुणे येथून अहिल्यानगरकडे बसने प्रवास करणार्या महिलेच्या बॅगेतील सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटन

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने
मोहटादेवी देवस्थानचा पदभार धर्मादाय उपायुक्तांकडे  
राहता तहसीलच्या ‘संजय गांधी’ विभागात सावळागोंधळ?नागरिकांची तक्रार ; कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी  
tulshibaug-women-jewelry-theft-pune-police-investigation | तुळशीबागेत  महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास; खरेदीच्या गर्दीत दागिने लांबविण्याच्या  घटनांमध्ये वाढ

अहिल्यानगर : पुणे येथून अहिल्यानगरकडे बसने प्रवास करणार्या महिलेच्या बॅगेतील सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनिषा विश्वास कुलकर्णी (वय 54, रा. रावेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (9 ऑगस्ट) रात्री फिर्याद दिली आहे. कुलकर्णी या नातलगांच्या घरी कार्यक्रमासाठी येत होत्या. 6 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्या घरातून निघाल्या. कार्यक्रमासाठी त्यांनी गळ्यातील सोन्याचे पट्टी मंगळसूत्र व कानातील सोन्याचे झुमके एका छोट्या पर्समध्ये ठेवले. ही पर्स त्यांनी मोठ्या बॅगेत ठेवली होती. दरम्यान बसमधून उतरल्यानंतर कुलकर्णी यांनी बॅगेची पाहणी केली असता छोट्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

COMMENTS