Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामपुरीत आंबेडकर जयंती उत्सवाची जोरदार तयारी; जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची प्रमुख उपस्थिती

रामपुरी : मौजे रामपुरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. 28 एप्र

डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीतून आचारण्याची वेळ : कोल्हे
भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान
राहाता शहरात महात्मा फुले यांना अभिवादन

रामपुरी : मौजे रामपुरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. 28 एप्रिल 2026, मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
यंदाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने रामपुरी गावात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गदर्शनपर भाषणे होणार असून युवकांना प्रेरणा देणारे संदेश दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे, किशोर कांडेकर, सचिन उजगरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच परिसरातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून ठिकठिकाणी सजावट, फलक आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी शिस्तबद्ध नियोजनासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व इतर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मौजे रामपुरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकास शरणांगत, उपाध्यक्ष प्रविण शरणांगत तसेच मार्गदर्शक कचरू शरणांगत, विक्रम शरणांगत, धम्मपाल शरणांगत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

COMMENTS