Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरात महात्मा फुले यांना अभिवादन

राहाता : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच डॉ.बाबासाहेब

कृतज्ञतेचा महासागर उसळला! बीडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगिकारावा-आ.केराम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिमेचे उपस्थीतांना वाटप; पार्डी(म) ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या! विधानसभेत ठराव मांडणार;  मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

राहाता : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या अर्धकृती पुतळ्याचा पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी समाजाला दिलेला नवा मार्ग आणि समानतेचा संदेश यावरही यावेळी भाष्य करण्यात आले.

या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राहाता शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समस्थ माळी पंच राहाता, अखिल भारतीय समता परिषद, माळी नगरचा राजा मित्र मंडळ तसेच बनकर वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आज संध्याकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS