बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संवैधानिक न्याय, महिला व

बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संवैधानिक न्याय, महिला व बाल सक्षमीकरण ही मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मानवता फाउंडेशन चे धम्मभूमी बुद्ध विहार डॉ. भदंत आनंद कौशल्य या नगर शिवणी येथे बुद्ध जयंती महोत्सवामध्ये डॉ. भिक्खू इंदवंश महाथेरो (छ. संभाजीनगर), धम्मभूमी शिवणीचे निर्माते भिक्खु धम्मशील थेरो (हिंगोल/बीड), भिक्खू संघ व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ड. राजेश शिंदे हे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत मागील पंधरा वर्षांमध्ये त्यांनी विविध माध्यमातून लोकांना मदत करण्याचं कर्तव्य निभावलेले आहे. संस्थात्मक काम करण्याच्या भावनेने त्यांनी मानवता फाउंडेशन ची निर्माण केली असून येणार्या काळात अधिक गतीने काम करण्याचा त्यांचा हेतू आहे. बौद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी मानवता फाऊंडेशन ची सुरुवात करून बुद्धांच्या मानवतेचा संदेश पुढे संकल्प आहे. सम्यक सम बुद्धांच्या मार्गदर्शक पंचशील तत्त्वाप्रमाणे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संविधानिक न्याय , महिला आणि बाल सबलीकरण ही पाच मुख्य उद्दिष्ट घेऊन मानवता फाऊंडेशन काम करणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमास डॉ. भिक्खू इंदवंश महाथेरो (छ. संभाजीनगर), धम्मभूमी शिवणीचे निर्माते भिक्खु धम्मशील थेरो (हिंगोल/बीड), भिक्खू रेवतबोधी थेरो (नांदेड), भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली),श्रामनेर भंते बुद्ध बोधी (शिवणी),मा. सचिन पांडकर साहेब,अतिरिक्त पोलीस अधिक्षक, बीड, तुळशी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, रिपाईचे राजू जोगदंड, प्रा. प्रेमचंद शिरसाट, जी. एम. भोले, प्रा. राम गायकवाड, प्रदीप घाडगे, मेजर राजाभाऊ आठवले, ड. राजेश वाघमारे, पत्रकार तथा सदस्य सुनील डोंगरे, राजू डोळस, अलका आठवले, सविता पाटील, रजनीकांत वाघमारे, प्रवीण टाकणकर, सौरभ तुरुकमारे, यशपाल डावकर, युवराज जाधव, संस्थेचे अध्यक्ष ड. राजेश शिंदे, उपाध्यक्ष मोहन खेमाडे, संस्थेचे सचिव सचिन शिंदे, यांच्यासह भिक्खू संघ, विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रमास आलेले उपासक उपासिका, व प्रियदर्शी धम्म संस्कार संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते..

COMMENTS