Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ऑक्सीजन हब हिमायत बाग वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

केंद्रीय व राज्य पर्यावरणमंत्र्यांचे वेधणार लक्ष

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - हिमायत बाग बचाना है, हम सब एक है.. अशा घोषणा देत पर्यावरणप्रेमींनी सकाळी आंदोलन केले. शहराचे ऑक्सीजन हब म्हणून ओ

आता मैदानात उतरलोय काय होईल ते बघून घेऊ – चंद्रकांत खैरे
औरंगाबादमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना | LOKNews24
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – हिमायत बाग बचाना है, हम सब एक है.. अशा घोषणा देत पर्यावरणप्रेमींनी सकाळी आंदोलन केले. शहराचे ऑक्सीजन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायत बागेची जागा महिला कृषी विद्यापीठाला देण्यास विरोध केला. हिमायत बाग हे मुघलकालीन गार्डन असून, ते पूर्णत: संपविण्याचा प्रयत्न मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुरू केला आहे. हिमायत बाग हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या अधिष्ठातांनी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविलेला आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असताना, राजकीय दबावाखाली येऊन कृषी विद्यापीठाच्या काही लोकांनी या जागेवर जैवविविधता वारसा स्थळ नाही, येथील 40 एकर जागेवरच झाडे आहेत, उर्वरीत 260 एकर जागा इतर कामासाठी उपयोगात आणू द्यावी, अशी मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही काही लोकांच्या फायद्यासाठी हिमायत बागेतील जागेचा विनाश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिमायत बागेच्या संरक्षणासाठी शहरातील सर्व नागरिकांनी पुढे यावे. संघटित होऊन हिमायत बाग वाचविण्यासाठी शासनावर दबाव आणावा, असे आवाहनही अम्बरेला वेलफेअर फाऊंडेशनचे अॅड. संदेश हंगे यांनी केले आहे.

कृषी विद्यापीठाने येथील 40 एकर जागा वगळून, उर्वरीत जागेत महिला कृषी विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे हिमायत बाग हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव राज्य शासनाला कृषी विद्यापीठाने मनपाच्या मान्यतेने महिना-दीड महिन्यापूर्वी पाठविलेला आहे. हा प्रस्ताव शासनाने मंजूर करावा, अशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे. यावेळी आंदोलनात अॅड. संदेश हंगे,  प्रयास युथ फाऊंडेशनचे रवी चौधरी, औरंगाबाद ब्लागर्स संस्थेचे स्वयंसेवक, (आय आर सी) इस्लामिक रिसर्च सेंटरचे प्रतिनिधी अॅड. फैज, वुई संस्थेचे पहाडे, मानद वन्यजीव रक्षक  डॉ.किशोर पाठक यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. ही एका संस्थेची संपत्ती नसून, राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचे संरक्षण व्हावे, यासाठी रविवारी हिमायत बाग बचाव आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आठवडाभरात आम्ही केंद्रीय व राज्य पर्यावरण मंत्र्यांना यासंदर्भात निवेदन देणार आहोत. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही भेट घेऊन, या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांना करणार आहोत, असे अॅड. संदेश हंगे यांनी सांगितले.

COMMENTS