बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात मंगळवार, दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन
बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात मंगळवार, दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून के.एस.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद विश्वनाथ क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या प्रवेशित महाविद्यालयामार्फत प्रदान करण्यात येणार आहे. त्यानुसार मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील मार्च/एप्रिल 2025 मध्ये पदवी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयात प्राप्त झाली आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या पदवी प्रदान कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून आपले पदवी प्रमाणपत्र स्वीकारावे, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
पदवी प्रमाणपत्र मिळणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून, उच्च शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय व खासगी क्षेत्रातील संधींसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहणार्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा ओळखपत्र पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत महाविद्यालयात उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्र स्वीकारावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पदवीधर विद्यार्थ्यांचा गौरव होणार असून, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची नोंद घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS