पाटोदा : वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत डॉ. रविंद्र राजपुरे यांची पाटोदा तालुका डॉक्टर

पाटोदा : वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत डॉ. रविंद्र राजपुरे यांची पाटोदा तालुका डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व डॉक्टरांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि असोसिएशनमधील सर्वसंमतीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
डॉ. राजपुरे गेल्या 26 वर्षांपासून पाटोदा तालुक्यात वैद्यकीय सेवा देत असून, त्यांनी रुग्णांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. कोरोना काळात त्यांनी तालुक्याची वैद्यकीय यंत्रणा सक्षमपणे हाताळत पाटोदा शहरात 30 बेडचे डीसीएचसी रुग्णालय सुरू केले. या माध्यमातून अनेक गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले. सन 2019 पासून ते तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच 2022 पासून पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या पॅनल मेंबरपदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. त्यांच्या पुनर्निवडीबद्दल वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रासह नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. दरम्यान, महेंद्रवाडी ग्रामस्थांनीही भूमिपुत्र डॉ. राजपुरे यांचे उत्स्फूर्त स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS