Homeताज्या बातम्या

येळंबघाट येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

येळंबघाट : येळंबघाट येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी येळंबघाट केंद्रांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधी

पाकिस्तानात शांतता यात्रेदरम्यान बॉम्बस्फोट; १३ लोकांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी
आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!
पाटेगाव सोसायटीच्या नवीन इमारतीचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; सहकार मजबूत करण्याचे आवाहन

येळंबघाट : येळंबघाट येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी येळंबघाट केंद्रांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली.

गटशिक्षणाधिकारी मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समूह साधन केंद्राच्या केंद्र समन्वयक श्रीमती एस. एस. देशमुख यांच्या आयोजनातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. एन. करडीले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. वाघमारे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून श्री. अशोक कोकाटे, श्री. अतुल वाघमारे व श्री. सदाशिव रोकडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी केंद्र समन्वयक श्रीमती देशमुख यांनी परिषदेचे प्रास्ताविक करत शिक्षण परिषदेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणे, तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक धोरणांतील बदलांची माहिती शिक्षकांना करून देणे हा शिक्षण परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

चालू शैक्षणिक वर्षातील प्रशासकीय कामकाज, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना, खान अकॅडमी, शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना, दीक्षा कोर्सेस तसेच शालेय कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रभावीपणे कार्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विविध शिष्यवृत्ती व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती तसेच पाचवी नवोदय परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

येळंबघाट केंद्रांतर्गत येणार्‍या १५ प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या परिषदेस उपस्थित होते. शैक्षणिक विषयांवरील मार्गदर्शन, चर्चा व विचारविनिमयामुळे परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. व्ही. एस. चौरे यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक श्री. डी. एस. लहाने, श्री. एन. पी. कदम, श्री. डी. आर. कांबळे, श्री. एस. जी. सुरवसे यांच्यासह शिक्षक व कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS