Homeताज्या बातम्या

यूपीएससी मध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश; ना. पंकजाताई मुंडे यांनी केले गाढे पिंपळगावच्या भूमिपुत्राचे अभिनंदन

परळी वै. : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गाढे पिंप

अंबाजोगाईत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार
उपवर्गीकरण ही भाजपची खेळी; मातंग समाजाला दुश्मन कसे मानणार? : मनिषभाऊ कावळे

परळी वै. : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गाढे पिंपळगाव, ता. परळी वैजनाथ येथील शेतकरी कुटुंबातील चैतन्य सुभाष राडकर याने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी चैतन्यचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

चैतन्य राडकर याच्या यशाची माहिती मिळताच ना. पंकजाताई मुंडे यांनी त्याचे वडील सुभाष राडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत चैतन्यला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चैतन्यच्या यशाचे कौतुक केले.

आपल्या संदेशात ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, आपल्या मतदारसंघातील गाढे पिंपळगाव येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी चैतन्य सुभाष राडकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चैतन्यने मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करू शकते, याचे चैतन्य राडकर याचे यश हे उत्तम उदाहरण ठरले आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या चैतन्यने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीसारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश मिळवत गाढे पिंपळगाव तसेच परळी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS