Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्रगतीशील उपक्रमांचा राज्यपालांकडून गौरव

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा

डॉ. बाबासाहेबांचे जीवन आजच्या पिढीस प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागरसौ. के.एस.के. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. मंडलिक
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचे यश  
06.05.2026 : कबचौउम व स्वारातीम विद्यापीठांच्या कुलगुरुंनी राज्यापालांसमोर  केले विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण | लोकभवन महाराष्ट्र | भारत

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांची भेट घेऊन विद्यापीठाच्या विविध प्रगतीशील उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला.
या भेटीत राष्ट्रीय स्तरावरील मानांकन उंचावण्यासाठी विद्यापीठाकडून सुरू असलेले प्रयत्न, नामशेष होत चाललेल्या दृश्यकला व लोककलांच्या जतन-संवर्धनासाठी राबविले जाणारे उपक्रम, ‘स्कूल कनेक्ट’ योजना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती, कौशल्याधारित शिक्षणाला दिलेले प्राधान्य तसेच संशोधन व नवोन्मेष क्षेत्रातील कार्याची माहिती देण्यात आली. विद्यापीठातील सर्वोत्तम शैक्षणिक पद्धती आणि गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले. यावेळी कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल कायम ठेवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी उपस्थित होते.

COMMENTS