Homeव्हिडीओ

पुढील वर्षी १५ लाख बेघरांना हक्काच्या घरांच्या चाव्या देणार, आगामी ५ वर्षांत प्रत्येक बेघराला पक्के घर देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

https://youtu.be/Kw4sem7PWCA महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला येत्या पाच वर्षात हक्काचे पक्के घर देणार अशी मोठी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

आजचे राशीचक्र सोमवार, १८ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
मामे बहिणीसह भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू | LOKNews24
भाजप उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले | LOKNews24

महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला येत्या पाच वर्षात हक्काचे पक्के घर देणार अशी मोठी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सातारा येथे आयोजित महाआवास अभियानाच्या सोहळ्यात ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एकाच वर्षात तब्बल ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक ठरला आहे. या घरांच्या निर्मितीसाठी राज्याला ९ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या ३० लाख घरांच्या उद्दिष्टापैकी अतिशय वेगाने काम पूर्ण करत पहिल्या टप्प्यात आज ५ लाख बेघर कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रशासकीय गती अशीच कायम ठेवून पुढील वर्षात आणखी १५ लाख लोकांना घरांच्या चाव्या दिल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांना पक्के घर’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर पार पडलेल्या या भव्य लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS