Homeताज्या बातम्या

गोदड महाराजांची यात्रा परंपरेनुसारच होणारग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय ; लोकवर्गणीचा शुभारंभ

   कर्जत : थोर संत सद्गुरू गोदड महाराजांची कामिका एकादशी निमित्त होणारी पारंपरिक रथयात्रा यंदाही परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या सहभागातूनच साजरी करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. यात्रेसाठी धर्मादाय आयुक्तांची अधिकृत परवानगी प्राप्त झाल्याची माहिती यावेळी यात्रा समितीने दिली. तसेच सार्वजनिक लोकवर्गणीचा शुभारंभ परंपरेनुसार करण्यात आला.यात्रेनिमित्त मंदिरात ग्रामस्थांची बैठक पार पडली. बैठकीनंतर परंपरेप्रमाणे मेघनाथ पाटील यांच्या हस्ते लोकवर्गणीचा शुभारंभ करण्यात आला. यंदाची रथयात्रा धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीनुसारच पार पाडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.बैठकीत बोलताना नामदेव राऊत यांनी गोदड महाराजांच्या यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा यंदाही कायम राहणार असून, त्यामध्ये कोणताही नवीन पायंडा पडू दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांची आवश्यक परवानगी घेतली असून, भाविकांनी कोणताही संभ्रम न बाळगता यात्रेसाठी लोकवर्गणी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यात्रेतील विविध मान-सन्मान हे पिढ्यानपिढ्या परंपरेने निश्चित झाले असून, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मेघनाथ पाटील यांना नोटीस देण्यात आली असली, अथवा त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाल्यास ग्रामस्थ ती सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.दादासाहेब सोनमाळी यांनी यात्रेची परंपरा गोदड महाराजांनी सुरू केली असून ती जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. यात्रेच्या वर्गणीची सुरुवात आषाढी एकादशीपूर्वी करण्याची परंपरा असताना यापूर्वीच वर्गणीच्या पावत्या वितरित करण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदविला. तसेच मंदिराच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या स्थापनेबाबत ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.यावेळी अंबादास पिसाळ, नितीन तोरडमल, सुनील शेलार, सतीश पाटील, संजय भैलुमे, काकासाहेब धांडे, पवार, सुरेश खिस्ती, दत्तात्रय शिंदे, रज्जाक झारेकरी, विशाल म्हेत्रे, बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

सत्तेसाठी दबावतंत्र, राजकीय सूड : नगराध्यक्ष घुले ; गटनेते बदलावरून वाद चिघळला; कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
शिलाई मशिनच्या नावाखाली ४३९ महिलांना गंडा; लाखो रुपये घेऊन भामटा पसार!

COMMENTS