अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली होती. १८० हून अधिक तरुणींचे लैंगिक शोषण कर
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली होती. १८० हून अधिक तरुणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य आरोपी मोहम्मद अयान आता पोलिसांच्या विळख्यात आहे.
परतवाड्याच्या रस्त्यांवरून जेव्हा पोलिसांनी अयानची धिंड काढली, तेव्हा लोकांचा संताप अनावर झाला होता. अयानने केवळ एका-दोघांना नाही, तर तब्बल १८० पेक्षा जास्त तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा खळबळजनक आरोप आहे. यावेळी पोलीस त्याला तपासासाठी तो राहत असलेल्या परिसरात आणि त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेले होते, तिथे त्याची कसून चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८ तरुणींच्या लैंगिक शोषणाचे स्पष्ट व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत. मात्र, हा आकडा १८० किंवा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इतकं भयानक कृत्य करूनही अयानच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही भाव दिसत नाहीये.
या रॅकेटचे जाळे केवळ परतवाड्यापुरते मर्यादित नसून, अमरावती आणि नागपूरपर्यंत पसरलेले आहे. अनेक सुशिक्षित तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढले होते. दरम्यान, या प्रकरणात पकडलेला एक आरोपी एमआयएम पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळणही लागण्याची शक्यता आहे.
सध्या अयान पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

COMMENTS