Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खिडकीतून पळ काढणार्‍या आरोपीला काही तासांतच पुन्हा अटक; शिवाजीनगर पोलिसांची तत्पर कारवाई

नांदेड : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यातील आरोपींनी पोलिसांची नजर चुकवत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली असली, तरी अल्पावधीतच पोलिसांनी

गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक
भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; 10घरफोड्या उघड – 78 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात आठवीतल्या मुलाचा लैगिंक छळ

नांदेड : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यातील आरोपींनी पोलिसांची नजर चुकवत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली असली, तरी अल्पावधीतच पोलिसांनी केलेल्या वेगवान कारवाईमुळे फरार आरोपींना पुन्हा अटक करण्यात यश आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासासाठी तीन आरोपींना हस्तांतरण वारंटवर ताब्यात घेतले होते. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाकडून त्यांची सखोल चौकशी सुरू होती. दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास दोन आरोपींनी पोलिसांची नजर चुकवत पोलीस ठाण्यातील खिडकीतून उडी मारून पळ काढला. ही घटना लक्षात येताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पळून गेलेल्या आरोपींपैकी एकाला काही वेळातच पकडण्यात यश आले, मात्र दुसरा आरोपी फरार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी करून शोधमोहीम अधिक तीव्र केली. शेवटी, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 5 मे रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास फरार आरोपी सोहेल अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर, नांदेड) याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर कोठडीतून पळून गेलेल्या आरोपीला इतक्या कमी वेळात शोधून अटक केल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित होत असून, अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

COMMENTS