Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगणी खुर्द येथील पानंद रस्ते लवकरच होणार अतिक्रमणमुक्त! तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे प्रत्यक्ष पाहणी करून आदेश; शेतकर्‍यांना मोठा दिलासा

बीड : तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पानंद रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. गुरुवारी (दि. 21) बीडचे तहस

नांदेड शहरात रस्त्यावरच कायद्याची धज्जी! ट्रॅफिक पोलिसाची दादागिरी, तरुणाला उघड धमक्या; व्हिडिओ व्हायरल होताच संताप उसळला
जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई
अर्धापूर-असना महामार्गावरील अतिक्रमणांवर ‘थातूर-मातूर’ कारवाई; नागरिकांचा संताप वाढला

बीड : तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पानंद रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. गुरुवारी (दि. 21) बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी जायभाय आणि तलाठी इनकर यांनी स्वतः गावात जाऊन या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीअंती रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार शेळके यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
हिंगणी खुर्द हे गाव मांजरा नदीच्या काठावर वसलेले असल्याने येथे उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतीमाल आणण्यासाठी आणि दळणवळणासाठी येथील शेतकर्‍यांना पानंद रस्त्यांचा वापर करावा लागतो. मात्र, अनेक ठिकाणी या रस्त्यांवर अतिक्रमणे झाल्याने शेतकर्‍यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही बाब गांभीर्याने घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गुरुवारी तब्बल दोन तास पायी चालत तुळजाभवानी मंदिर रस्ता, नागरगोजे वस्ती, आंधळे वस्ती आणि मुंडे वस्ती रस्त्यांची सविस्तर पाहणी केली. सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करून ते ग्रामस्थांसाठी खुले केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौर्‍यादरम्यान हिंगणी खुर्दचे सरपंच संतोष तांदळे, हिंगणी खुर्द सोसायटीचे चेअरमन सचिन आंधळे यांच्यासह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्यासाठी रस्ते महत्त्वाचे!
हिंगणी खुर्द हे ऊस उत्पादक गाव आहे. शेतातील ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी आणि दैनंदिन दळणवळणासाठी हे पानंद रस्ते आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमच्या मागणीमुळे प्रशासनाने स्वतः रस्त्याची पाहणी करण्यासाठी आमच्या शेतात आले. आमचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे
-सचिन आंधळे, हिंगणी खुर्द सोसायटीचे चेअरमन

COMMENTS