Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंदुरबार राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांपासून नंदुरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. त्याला आता यश मिळा

फुगलेला बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जागेवर आला, जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नाला यश, कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकालाची घसरण
29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
कर्जतमध्ये संत सद्गुरू गोदड महाराजांच्या यात्रेला सुरूवात

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांपासून नंदुरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. त्याला आता यश मिळाले असून जिल्हा आता अमली पदार्थ मुक्त झाला असून त्याची घोषणा नाशिक विभागाचे विशेष पोलिस अधीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केली.
छोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सात हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अमली पदार्थ मुक्त शपथ घेतली. राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने सोशल पोलिसिंग करून शाळा महाविद्यालयात जनजागृती केली. गावागावात जाऊन ग्रामपंचायतीच्यावतीने ठराव करून गावागावात जनजागृती केली. त्यातून जिल्हा अमली पदार्थ मुक्त जिल्हा झाला आहे. यासाठीचा कार्यक्रम आज नंदुरबार जिल्हा पोलिस मैदानावर झाला.  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळांचे सात हजार विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी पालक आणि उपस्थितांनी अमली पदार्थ मुक्त जिल्हा कायम ठेवण्यासाठी शपथ घेतली.

COMMENTS