Homeताज्या बातम्या

मुंबईतील वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त; अन्न, नागरी पुरवठा विभागाची कारवाई

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅक

भोंदू अशोक खरातला मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई; कोट्यवधींची रोकड, दागिने आणि आलिशान मोटार जप्त
अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवी गती; उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मुंबईतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेला नराधम जेरबंद
How Egertons is cutting fuel theft and waste with data

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ जून २०२६ रोजी दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे आढळून आले.

दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले. तपासात २० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्लास्टिक पाईप व व्हॉल्व्हच्या साहाय्याने इंधन काढले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तपासणी केलेल्या एमएच-०४ केयू-१८२६ (MH-04 KU-1826) या टँकरमध्ये १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल, तर एमएच-०४ एलवाय-६३८८ (MH-04 LY-6388) या टँकरमध्ये २९ हजार लीटर विमान इंधन (एटीएफ) असल्याचे आढळून आले.

कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व (एटीएफ) इंधनासह संबंधित टँकर आणि अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहाय्यक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी केली.

COMMENTS