Homeताज्या बातम्या

अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवी गती; उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

मुंबई : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि विविध धार्मिक विधींच्या आड महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात

अशोक खरातच्या कोठडीत वाढ, चौदावा गुन्हा दाखल
खरात प्रकरणातील महत्वाचा साक्षीदाराचा अपघातात ठारशिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा मृत्यू
रूपाली चाकणकरांना आता ईडीची नोटीसअशोक खरात प्रकरणात चौकशीला वेग
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष  सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता

मुंबई : अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि विविध धार्मिक विधींच्या आड महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती केली आहे.

अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपविण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातशी संबंधित ठिकाणांवर करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान महिलांच्या शोषणाशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या अनेक चित्रफिती (व्हिडिओ) आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या पुराव्यांच्या आधारे तपास अधिक व्यापक करण्यात आला असून सर्व बाबींची सखोल छाननी सुरू आहे. खरातविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक तसेच जादूटोणा आणि अमानुष प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे काही प्रभावशाली व्यक्तींशी जोडले गेल्याची चर्चाही सुरू आहे; मात्र तपास यंत्रणांनी यावर अधिकृतपणे बोलणे टाळले आहे. अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे या खटल्याला मोठे बळ मिळणार असून, आगामी काळात तपास आणि न्यायालयीन सुनावणी अधिक वेगाने पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS