Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐसाम शिलेदारची बास्केटबॉल तपश्‍चर्या कौतुकास्पद – पो.नि. डोईफोडे

नेवासा बुद्रुक व खुर्द ग्रामस्थांच्या वतीने ऐसामचा सत्कार

नेवासाफाटा /प्रतिनिधी ः  कुठलीही विशेष सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बास्केटबॉल खेळाची ऐसाम शिलेदारने जपलेली आवड व केलेली तपश्‍चर्य

कोतवालीचे पोलिस करणार आता बोठेची सखोल चौकशी ; नगरच्या विनयभंग गुन्ह्यात झाला वर्ग
तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत
मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल l LokNews24

नेवासाफाटा /प्रतिनिधी ः  कुठलीही विशेष सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बास्केटबॉल खेळाची ऐसाम शिलेदारने जपलेली आवड व केलेली तपश्‍चर्या कौतुकास्पद आहे. असे प्रशंसनीय उद्गगार नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी काढले.
  नेवासा न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ सादिक शिलेदार यांचा मुलगा ऐसाम याची काठमांडू नेपाळ येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळासाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल नेवासा बुद्रुक व खुर्द ग्रामस्थांच्या वतीने नेवासा येथील प्रणाम हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे होते. तर  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर तसेच मौलाना अलीम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध संस्था, संघटनांसह व्यक्तींनी ऐसामसह त्याचे कोच हाजी मुजफ्फर शेख तसेच वडील अ‍ॅड.सादिक शिलेदार यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना पो.नि.शिवाजी डोईफोडे यांनी बास्केटबॉल खेळातील बारकावे स्पष्ट करून पुढे म्हणाले की, खेळात कौशल्य प्राप्त करतांना खेळाडूला मोठ्या प्रमाणावर भौतिक सुखाचा त्याग करावा लागतो. ऐसामला त्यांनी ऑलंपिक सामन्यांत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा देऊन या खेळात त्याचा दर्जा वाढण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच आपल्या एवढ्या मोठ्या देशातुन 12 बास्केटबॉल खेळाडु मिळु शकत नाही. जे ऑलिम्पिकमध्ये खेळवु शकेन.आपण कोठे कमी पडतो याचा अभ्यास त्यांच्या कोचचा व ऐसामचा झाला असेल. त्यांनी प्रयत्न करावे येणार्‍या काळात भारताची टिम ऑलिम्पिकमध्ये दिसावी. तिचा कॅप्टन ऐसाम असावा अशी आशा व्यक्त केली.
गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यावेळी म्हणाले की, नेवासा तालुक्याच्या मातीची उज्वल परंपरा असून ग्रामीण भागातील मुलाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळासाठी निवड होणे हिच मुळात अभिमानाची बाब आहे. यासाठी त्याला प्रोत्साहन देणार्‍या पालकांसह ग्रामस्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मौलाना अलीम, नगरसेवक सुनील वाघ,मकरंद देशपांडे, अ‍ॅड.बन्सी सातपुते, अ‍ॅड. काका गायके,संभाजी ठाणगे,शिवाजी गपाट, गफूर बागवान, बालेंद्र पोतदार, महेश मापारी, आम् आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजु आघाव, शहराध्यक्ष संदीप आलवने, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन सचिन धोंगडे यांनी केले. यावेळी संभाजी पवार, अ‍ॅड भैय्या काझी, सतिष पिंपळे, सुधीर चव्हाण,राजेंद्र पंडीत,किरण भालेराव,परवेज पठाण,बाळासाहेब पाटील, महेश लोखंडे, अनिल बोरकर, निलेश जगताप, रंजन जाधव, फारुख आतार, राजूभाई शेख, मुख्तार शेख, इम्रान दारुवाले,आसिफ पठाण, फारुख कुरेशी, महमद आतार, देवराम सरोदे,किशोर बोर्डे ,स्वप्निल जाधव ,करीम सय्यद, अ‍ॅड कैलास व्यवहारे ,पप्पु देशमुख आदींसह नेवासा बुद्रुक,नेवासा खुर्दचे नागरिक उपस्थित होते.

COMMENTS