Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रक धडकेत निवडणूक प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी

देवळाली प्रवरा ः लोकसभा निवडणूक मतदान प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या शिक्षक प्रशिक्षणार्थीच्या कारला ट्रकने धडक दिल्याने त्यात प्रशिक्षणार्थी शिक्

दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .
मध्यप्रदेशात बस दरीत कोसळून 15 जणांचा मृत्यू

देवळाली प्रवरा ः लोकसभा निवडणूक मतदान प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या शिक्षक प्रशिक्षणार्थीच्या कारला ट्रकने धडक दिल्याने त्यात प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी होण्याची घटना राहुरीमध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजयकुमार आहेर (वय-39,व्यवसाय शिक्षक, रा.पोखरी,ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली असून ते शनिवारी सकाळी 8 वा. आपले शिक्षक सहकारी भिमराज कापसे, शिवाजी चौधरी, शेख शेखचंद अहमद हे सर्व राहुरी कृषी विद्यापीठ येथे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्या स्विफ्ट मारूती कारमधून जात होते. सकाळी 8.45 च्या सुमारास नगर-मनमाड हायवेवर मुळा डॅम फाटयाच्यापुढे सिमेंन्स स्टेशनजवळ पाठीमागून ट्रकने भरधाव वेगात धडक दिल्याने कार ही समोरच्या गाडीवर धडकली. या धडकेत आपल्या छातीला, खांद्याला मुकामार लागून आपण जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महेश राम जमादार याच्याविरूद्ध भादंवि कलम 279, 337 427, 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

COMMENTS