Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मा

संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकरांसह गुन्हा दाखल
कृषी कायदे मागे घेणे म्हणजे सर्वोच्च सभागृहांचा अपमान : पोपटराव पवार
ओबीसी समाज राजकीय पर्याय निर्माण करणार -नवनाथ पडळकर

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले गेलं होतं. हिंदूजा रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते आहेत.  तीन टर्म विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती. या काळात  भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाळासाहेबांची नाराजी यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द पूर्ण करण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता. पुढच्या निवडणुकीत त्यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली. उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव चर्चेत होतं.

COMMENTS