Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच आणि गोरगरीब जनेतेचे देणंघेणं नाही त्यांना फक्त राजकारण करायचे:- गोकुळ दौड

पाथर्डी प्रतिनिधी - पाथर्डी तालुका जिरायती असल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे तसेच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून पक्षाचा विषय नंतरचा आहे मी श

वृषाली कडलग यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
चार जागा बिनविरोध झाल्याचा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष
काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

पाथर्डी प्रतिनिधी – पाथर्डी तालुका जिरायती असल्याने शेतकऱ्यांचे पिकाचे तसेच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून पक्षाचा विषय नंतरचा आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने राज्यात आणि देशात जरी आमचं सरकार असलं तरी जर शेतकऱ्यांना न्याय भेटत नसेल तर मी शेतकऱ्यांसोबत असेल हे उपोषण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी सुरू केले आहे पाथर्डी तालुक्याची परिस्थिती सर्व महाराष्ट्राला माहीत असतानाही तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर होत नाही म्हणजे एकप्रकारे शासनाने येथील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.येथील सत्तेतील गैरसत्तेतील लोकप्रतिनिधी असतील त्यांना फक्त राजकारण करायचे असून शेतकऱ्यांच आणि गोरगरीब जनतेचे त्यांना काही देणंघेणं नाही असे प्रतिपादन भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा व त्या यादीत कोरडगाव मंडळाचा समावेश करावा या मागणीसाठी बुधवारी नाईक चौकात आपल्या समर्थकांसह बेमुदत उपोषणाप्रसंगी केले.दरम्यान संध्याकाळी उपोषणस्थळी तहसीलदार शाम वाडकर आणि पोलिस निरीक्षक संतोष मुटकूळे यांनी दौड यांची भेट घेत येत्या १५ दिवसांच्या कालावधीत कोरडगाव मंडळ हे दुष्काळग्रस्त जाहीर करू असे दौड यांना आश्वासन दिल्यानंतर उपोषन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

     यावेळी बाळासाहेब गर्जे,रमेश कचरे,बाबुराव बांगर,बापूसाहेब गर्जे,नवनाथ ढाकणे,दत्तात्रय गर्जे, अमोल सोलाट,आदिनाथ गिते, भास्कर खेडकर, अशोक घोडके,ती जालिंदर साप्ते,राम जाधव,विकास बांगर,सखाराम खेडकर,गहीनीनाथ दराडे आदी जण उपस्थित होते.यावेळी उपोषणस्थळी शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले,वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण,आम आदमी पार्टीचर किसन आव्हाड,मोहटा गावचे उपसरपंच अविनाश फुंदे आदींनी भेट पाठींबा जाहीर केला.

यावेळी पुढे बोलताना गोकुळ दौड यांनी म्हटले की,७ नोव्हेंबर रोजी पाथर्डी-शेवगाव तालुक्याला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले होते.महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये पाथर्डी-शेवगाव तालुक्याच्या समावेश केला गेला नव्हता.त्यानंतर १० तारखेला महाराष्ट्र शासनाने पाथर्डी- शेवगाव तालुका दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली.ते जाहीर करत असताना पाथर्डी तालुक्यातील जुन्या सहा मंडळातील कोरडगाव मंडळ त्यामध्ये वगळण्यात आले.पाथर्डी तालुका हा जिरायती तालुका असून या तालुक्यातील शेतकरी कष्टकरी हे महाराष्ट्रात ऊसतोडणी साठी जातात हे सर्वांना माहीत आहे.आज परिस्थिती गंभीर असून पिण्याला शेतीला पाणी नाही.शेतकऱ्यांचे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत.तरीही दुष्काळ जाहीर न केल्याने आम्ही प्रशासनाला कोरडगाव मंडळातील गावात दुष्काळ जाहीर करावा यासाठी निवेदन देऊन वेळ दिला होता.परंतु अद्यापही या गावचा समावेश न झाल्याने या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत.

COMMENTS