Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवासी वस्तीगृहासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार -डॉ.योगेश क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - भगवंत फाऊंडेशन बीड आणि डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र संचलित आर.के.गुरुकुल निवासी वसतिगृहाचे नामकरण व उद्घाटन सोहळा समारंभ डॉ.बाब

फरार असलेला गुंड बाळा दराडे अखेर जेरबंद
कर्म असतं, कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते : उदयनराजे भोसले
Murbad : मुरबाडच्या जगन विशे गाडी चालकाचा प्रामाणिकपणा (Video)

बीड प्रतिनिधी – भगवंत फाऊंडेशन बीड आणि डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र संचलित आर.के.गुरुकुल निवासी वसतिगृहाचे नामकरण व उद्घाटन सोहळा समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या शिकवणीप्रमाणे गोर गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळावे व कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समाजभूषण स्व.रमाकांत शेठ कदम यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने भगवंतकुमार फाऊंडेशन बीड आणि डेबूजी युथ ब्रिगेड भारत संचलित आर.के.गुरुकुल निवासी वस्तीगृह नामकरण व उद्घाटन सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेबूजी युथ ब्रिगेड भारत चे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार  होते तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भगवंतकुमार फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नन्नवरे हे होते. यावेळी श्रीमती रेखाताई रमाकांत कदम, आशिष रमाकांत कदम, सलीम जहांगीर, शुभम धुत, भूषणजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, जिथे जिथे गाडगे महाराजांचे नाव येत तिथे तिथे अभिमानाने मान उंचावते. नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात गाडगे महाराजांचा पुतळा उभारला. सामाजिक सभागृह उभे केले. याठिकाणी समाज बांधवांकडून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आर.के.गुरुकुल निवासी वस्तीगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांना सर्व सुविधा पुरविण्याचे काम केले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. समाजातील सर्व दानशुरांनी वस्तीगृहांना मदत करायला पाहिजे. जेणेकरून समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गोर गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी यासाठी योगदान द्यावे. निवासी वस्तीगृहामध्ये संस्था चालकांनी विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण, जेवण यासह इतर सर्व सोयी सुविधा पुरविल्या पाहिजेत. यावेळी भविष्यात निवासी वस्तीगृहासाठी मदत करू व शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. या कार्यक्रमास समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS