दिसपूर : आसाममधील अनेक भागांमध्ये पुराचा कहर वाढत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याश

दिसपूर : आसाममधील अनेक भागांमध्ये पुराचा कहर वाढत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गृहमंत्र्यांनी वाढत्या नदीपातळीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच बचावकार्य, मदत वितरण आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनांची प्रगती याबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात सांगितले की, राज्यात सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन मोहिमेची सविस्तर माहिती त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धेमाजी जिल्ह्यातील परिस्थितीची विशेष दखल घेतल्याबद्दल त्यांनी अमित शाह यांचे आभार मानले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, धेमाजी जिल्ह्यातील चार महसूल मंडळांतील एकूण 69 गावांना पुराचा फटका बसला असून, सुमारे बावीस हजार नागरिक बाधित झाले आहेत. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार पुरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. बाधित नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, तातडीची मदत आणि दीर्घकालीन पुनर्वसनासाठी उपलब्ध सर्व साधनसंपत्ती वापरण्यात येत आहे.

COMMENTS