Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

मुक्रमाबाद येथे 13 मे रोजी ‘पहिली बौद्ध धम्म परिषद’ व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम

बुद्ध जयंतीनिमित्त ‘संविधान बचाव अभियान’ मुक्रमाबाद विभागाच्या वतीने बुधवार, दि. 13 मे 2026 रोजी भव्य ‘पहिली बौद्ध धम्म परिषद’ तसेच भीमगीतांचा प्

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
अशोक खरातच्या जीवाला धोका : दमानिया
मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले वाहनतळावर;हेलिपॅडवर न उतरवल्याने संताप ; कोणतीही जीवितहानी नाही



बुद्ध जयंतीनिमित्त ‘संविधान बचाव अभियान’ मुक्रमाबाद विभागाच्या वतीने बुधवार, दि. 13 मे 2026 रोजी भव्य ‘पहिली बौद्ध धम्म परिषद’ तसेच भीमगीतांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक ऐक्य, संविधान जागर आणि धम्म विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरात जय्यत तयारी सुरू आहे.
या परिषदेत कीर्तनाच्या माध्यमातून शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचार मांडणारे प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. धम्मकीर्ती महाराज परभणीकर यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रख्यात गायिका आयु. कडूबाई खरात या आपल्या भीमगीतांच्या सादरीकरणातून उपस्थितांचे प्रबोधन करणार आहेत. हा कार्यक्रम ग्रामपंचायत मैदान, मुक्रमाबाद येथे सायंकाळी 7 वाजता सुरू होणार असून अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे राहणार आहेत. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी भातलवंडे , आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष गौतम काळे, मुक्रमाबादच्या सरपंच  अंजिताताई बोधणे यांच्यासह महसूल, पोलीस प्रशासन व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संविधान बचाव अभियानाचे अध्यक्ष माणिक  गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत  मेटकर, सचिव अशोक  कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. संविधान आणि धम्म विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजित या ऐतिहासिक परिषदेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गावात ठिकठिकाणी स्वागत फलकही लावण्यात आले आहेत.

COMMENTS