Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध धंदे चालकांना लातूर पोलिसांचा बसला जोरदार दणका

लातूर प्रतिनिधी - लातूर पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदाचा पदभार सोमय मुंडे यांनी 20 ऑक्टोबर 2022 मध्ये स्विकारला. त्यानंतर आत्तापर्यन्तची सर्वात

पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.
भूमाता फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम महिलांना साडी वाटप
बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प

लातूर प्रतिनिधी – लातूर पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदाचा पदभार सोमय मुंडे यांनी 20 ऑक्टोबर 2022 मध्ये स्विकारला. त्यानंतर आत्तापर्यन्तची सर्वात मोठी कारवाई करत अवघ्या पाच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध 1 हजार 746 गुन्हे दाखल करून जवळपास 2 हजार आरोपीवर कार्यवाही केली आहे. तसेच अवैध धंद्यांवरील कारवाई मध्ये 2,9 लाख 82 278 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे एका बाजूने अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहे. तर दुस-या बाजूने लातूरातील नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. दिर्घ काळा नंतर अवघ्या पाच महिन्यात अवैध धंद्याविरुद्ध मोठी कारवाई झाल्याने लातूर पोलीस दलात हा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर करून नागरिकाकडून अवैध धंद्याची माहिती मिळवून अवैधधंदे करणा-या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. माहिती देणा-याचे नावही गुपित ठेवले जात असल्याने या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होऊ न देता वाहतूक सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावरही तोडगा काढत पोलीस अधीक्षकांनी वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात जनजागृती व्हावी याकरिता सेवाभावी संस्था, रोटरी क्लब व इतर माध्यमातून वाहतूक नियमांची मोठया प्रमाणात जनजागृती केली आहे. वाहतूक विभागामार्फत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणा-या 53 हजार 971 वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून 1 कोटी 21 लाख 10 हजार 690 रुपयांचा दंड वसूल करून शासन जमा करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून घातक शस्त्र हातात घेऊन, फिल्मी डायलॉग म्हणत त्याचे फोटो, व्हिडिओ, रिल्स सोशल मीडियावर प्रसारित करणा-या अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना गुन्हेगारीकडे वळन्या पासून वाचण्यासाठी त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन मुलाच्या कृत्याबद्दल माहिती देऊन त्यांना साभार प्रमाणपत्र देण्याची मोहीम राबविण्यात येत असून आज पर्यंत 182 साभार प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तसेच लातूर शहरातील गजबजलेल्या ट्युशन एरिया मध्ये वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन राबवीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक व मोटारवाहन कायद्यानुसार कारवाई करत पोलीसगस्त वाढवण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच लातूर पॅटर्नला साजेसे कार्य करत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पाच महिन्यात लातूर पोलिसांनी समाज विघातक प्रवृत्तीवर कारवाई केली असून अशा प्रकारची कारवाई यानंतरही निरंतरपणे चालू राहणार आहे.

COMMENTS