Homeताज्या बातम्याअहमदनगर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करणाऱ्या बाबत तक्रार दाखल करा

समाजाचे प्रश्न व अडचणी मांडण्यासाठी, आपली विविध कौशल्य दाखविण्याठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे मात्र दुर्दैवाने काहीजण त्याचा दुरुपयोग करीत

गँगवॉरच्या छायेत नांदेड पोलिसांचा श्वास गुदमरतोय!1 हजार 500 नागरिकांमागे एकच पोलिस, कायदा-सुव्यवस्था धोक्यात
वशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारीत कराआमदार रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
‘हात-पाय तोडले तरच लोकांना कायद्याचा धाक बसेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी




समाजाचे प्रश्न व अडचणी मांडण्यासाठी, आपली विविध कौशल्य दाखविण्याठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे मात्र दुर्दैवाने काहीजण त्याचा दुरुपयोग करीत आहे. महापुरुषांबाबत सोशल मीडियावर काहीजण आक्षेपहार्य व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकून धार्मिक वाद निर्माण करत आहे. अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी एन एस यु आय व पुरोगामी युवक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
        संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये  एन एस यु  आय  व पुरोगामी युवक संघटनांच्या वतीने याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेखर सोसे, हर्षवर्धन सातपुते, गौरव गुंजाळ, ऋषिकेश मांडेकर, सार्थक गुंजाळ , सार्थक श्रीपत, सुदर्शन सानप, सत्यजित गुंजाळ ,तेजस हासे ,यश उगलमुगले, प्रितम साबळे, अविनाश शिंदे ,राम अरगडे ,सत्यजीत थोरात,  आदी युवक उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत स्वामी आनंद स्वरूप या नावाने चालवण्यात येणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट वर दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत आक्षेपार्ह व समाजातील निर्माण करणारी पोस्ट प्रसारित करण्यात आली आहे. सदर पोस्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कौशल्याबाबत चुकीची, दिशाभूल करणारी व ऐतिहासिक दृष्ट्या अयोग्य अशी माहिती देण्यात आलेली आहे. यामुळे शिवप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सोशल मीडिया अकाउंट धारका विरोधात योग्य ती कायदेशीर तात्काळ कारवाई करण्यात यावी. व त्यास कठोर शिक्षा करण्यात यावी.
       भविष्यात अशा प्रकारच्या भडकवून व समाज विभाग पोस्टवर पोलीस प्रशासनाने निर्बंध घालावे. व दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा  एन एस यु आय  व पुरोगामी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

COMMENTS