Homeताज्या बातम्या

कुकडीखालील १३ गावांत पाणीबाणी; शेतकरी संतप्त, पिकांसह पिण्याचा प्रश्न ऐरणीवर

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने विसापूर तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, अन्य तलावही भरण्याची प्रक्रिया

राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी; आईला प्रथम गुरू मानून माता पालकांचे पाद्यपूजन!
विठ्ठल नामाच्या गजरात सहयोग कॅम्पस झाला भक्तिमय; चिमुकल्या वारकर्‍यांच्या दिंडीने वेधली सर्वांची मने
विना अटी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने विसापूर तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, अन्य तलावही भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कुकडी जोड कालवा किलोमीटर १३२ खालील १३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिकांसाठी पाणी नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून, ‘‘पाणी द्या; अन्यथा जीवनयात्रा संपविण्यासाठी हाती दोर द्या,’’ अशी आर्त साद शेतकऱ्यांनी घातली आहे.

कुकडी प्रकल्पातील माणिकडोह व पिंपळगाव जोगे वगळता, सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशानुसार येडगाव धरणातून कालव्यात १४०० क्युसेकने पाणी बंधारे भरण्यासाठी सोडले. जोड कालव्याचा परिसर असलेल्या घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, पारगाव, शिरसगाव, बोडखा, बाबुर्डी, मढेवडगाव, लिंपणगाव, श्रीगोंदा, चोराची वाडी, वेळू, म्हातारपिंप्री शिवारात कमी पाऊस आहे. प्रत्येक चाऱ्यांना तीन-तीन दिवस पाणी सोडले, तरी पिण्याचा पाणीप्रश्न सुटू शकतो, अशी मागणी माजी नगरसेवक सुनील वाळके यांनी केली. ओढ्या-नाल्यांना पाणी सोडले जाते, मात्र १३२ खालील शेतकऱ्यांना पाण्याची गरज असताना सोडले जात नाही. आंदोलन केले तर सत्ताधारी वेगळा अर्थ काढतात. पाणी न सोडल्यास १३२ कालव्याचे कुलूप तोडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे सतीश बोरुडे यांनी दिला आहे.

दरम्यान, जोड कालवा १३२ ला पाणी सोडण्यासाठी वरिष्ठांकडे दररोज पाठपुरावा चालू आहे, पण अजून परवानगी मिळालेली नाही. पुढील दोन दिवसांत सकारात्मक निर्णय येण्याची आशा आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

COMMENTS