Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा अंगा

निर्माते आर. बी. चौधरी काळाच्या पडद्याआड; उदयपूरमध्ये कारचा भीषण अपघातात मृत्यू
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! नांदेडमध्ये खेळता खेळता ४ मुलं पाण्यात बुडाली
रिल्सच्या नादात समृद्धीवर भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी!
Nashik Lift Accident: नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर  लिफ्ट कोसळून मृत्यू, अपघाताचा मन विचलीत करणारा CCTV समोर | नाशिक ...

नाशिक : नाशिकमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा अंगावर लिफ्ट कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ही भीषण घटना नाशिकमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये घडली आहे. मृत महिलेचे नाव ज्योती अहिरे असल्याचे समोर आले असून, त्या तिथे कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामात असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट त्यांच्या अंगावर कोसळली.
अपघात इतका भीषण होता की ज्योती अहिरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने त्याच मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे मेडिकल कॉलेजमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिफ्टची देखभाल वेळेवर होत होती का? इतका मोठा तांत्रिक बिघाड प्रशासनाच्या लक्षात का आला नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. एक सामान्य कष्टकरी महिला अशा प्रकारे अपघाताला बळी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS