Homeताज्या बातम्यासंपादकीय

असली बेबंदशाही ओबीसी खपवून घेणार नाही ! 

मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनासाठी जरांगे-पाटील सारख्या कोणतेही आंदोलन आणि नेतृत्व न केलेल्या अल्पशिक्षित व्यक्तीभोवती जेव्हा एकवटतो, तेव्हा, हा

मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
उच्चभ्रू शेतकरी जातींच्या मग्रुरीला नरेंद्र मोदी यांनी ठेचून काढले! 

मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनासाठी जरांगे-पाटील सारख्या कोणतेही आंदोलन आणि नेतृत्व न केलेल्या अल्पशिक्षित व्यक्तीभोवती जेव्हा एकवटतो, तेव्हा, हा समाज विचारी नाही, यावर शिक्कामोर्तब होते. ओबीसी समाज देशात आणि राज्यात प्रथम क्रमांकावर असताना देखील आजपावेतो सत्तेपासून दूर ठेवण्यात आला. याविरोधात ओबीसींनी कधीही असंतोष निर्माण केला नाही. परंतु, महाराष्ट्रात राजकीय सत्ता आपल्या हातातून निसटली आहे, याची जाणीव होताच अडाणचोट नेतृत्वाखाली एकवटणारा मराठा समाज स्वतःचे हसे करून घेत आहे. काल इंदापूरची सभा आटोपल्यानंतर एक शेतकरी म्हणूनच ओबींसीं नेते गोपीचंद पडळकर यांनी उपोषणाला बसलेल्या मराठा शेतकऱ्यांना भेट देण्याचे ठरवले. खरेतर, मराठा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी ही बाब स्वागतार्ह होती. भेटीला येणाऱ्या पडळकर यांचे स्वागत करण्याऐवजी त्यांच्यावर चप्पलफेक करण्याची मजल मराठ्यांनी गाठली. हा जातीय माजोरडा प्रकार ओबीसी कधीही खपवून घेणार नाही. मराठा आरक्षण आंदोलन कायदा, न्यायव्यवस्था, सामाजिक सामंजस्य, सौहार्दता या सर्व संस्कारक्षम बाबींची ऐसीतैसी करीत आहे. हा प्रकार राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब कारवाई करून थांबवला पाहिजे. कारण, मराठा समाज आरक्षणाच्या नावावर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हाताबाहेर जाऊन महाराष्ट्राची घडी विस्कटवण्याचा प्रयत्न करित आहेत. “स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आम्हाला कोणत्या ध्येयापर्यंत जायचे आहे, हे आमच्या समोर स्पष्ट आहे; परंतु, अतिशय विरोधाभासांनी भरलेल्या या समाजात सुरूवात कुठून करावी हा आमच्या समोर प्रश्न आहे”, असा मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेसमोर मांडला होता. त्यानंतर भारतीय समाजाला कायदा, सुसंस्कृत आणि समतावादी समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ७५ वर्षांपूर्वी आम्ही एक देश म्हणून प्रारंभ केला होता. न्यायपूर्ण समाजासाठी वाटचाल सुरू असताना राजकीय सत्तेतील मलिदा एकट्यानेच खाऊ पाहणारा मराठा समाज राज्याच्या राजकीय सत्तेत मात्र कोणालाही भागिदार बनविण्यास तयार नव्हता. परिणामी त्यांच्या एक जातीय सत्तेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरूंग लागला. मराठा राजकीय सत्तेतून हद्दपार होत असल्याचे उभे राहणारे दृश्य, मराठा समाजाला विचलित करू लागले. त्यातून आपले वैभव पुन्हा मिळविण्यासाठी मराठा आरक्षणाच्या नावाखाली आंदोलनाचा बागुलबुवा उभा करण्यात आला आहे. आता हा बागुलबुवा राज्यात लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसींच्या नेत्यांवरच हल्लाबोल करित असेल तर, ते ओबींसीं समाज कदापि खपवून घेणार नाही. कायदा, न्यायव्यवस्था हे मानायलाच मराठा समाज सध्या तयार नाही; याचा अर्थ मराठा समाज राज्यात अराजकता निर्माण करू पाहतोय हे स्पष्ट होते. कोणत्याही सभ्य समाजाला अराजकता परवडणारी नसते. कारण अराजकता ही एकप्रकारची रानटी व्यवस्था असते. तेथे कोणीही कोणाला जुमानत नाही! सध्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज याच दिशेने आगेकूच करू पाहतोय. त्यांना कशी वाटचाल करायची ती त्यांनी करावी, परंतु, खबरदार ओबीसींच्या नेत्यांवर हल्ले केले तर याद राखा! मराठा समाजाला एक प्रकारे खुली सुट एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दिली आहे का? हे एकदा जाहीर करावं, म्हणजे ओबीसींना या राज्यात सरकार अस्तित्वात नाही, असा समज तरी करून घेता येईल. गेली ७५ वर्षे ओबींसीं समाज राजकीय सत्तेच्या बाहेर राहीला आहे. परंतु, तुम्ही अवघी काही वर्षे मुख्यमंत्री पदापासून लांब राहिलात, तर एवढा थयथयाट माजवताय! असली बेबंदशाही आता ओबीसी समाज खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेवा. भुजबळ, पडळकर, आव्हाड, मुंडे, खडसे, देवरे, शेंडगे, वडेट्टीवार, पटोले कदाचित हे राजकीय पक्ष अथवा संघटना म्हणून वेगवेगळे असतील; परंतु, ओबींसीं म्हणून ते आमचे नेते आहेत. त्यांच्यावर कोणी जातीय द्वेषातून हल्ला करीत असेल, तर, तो आम्ही खपवून घेणार नाही!

COMMENTS