Homeताज्या बातम्या

अमन व्हॉलीबॉल अकॅडमी बीड येथे खेळाडूंचा सत्कार समारंभ; राज्यस्तरीय विजेत्यांचा विशेष गौरव

बीड : येथील अमन व्हॉलीबॉल अकॅडमीमध्ये विविध वयोगटातील खेळाडूंच्या गौरवार्थ आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात

आदिशक्ती संत मुक्ताई पालखी मार्गावरील अस्वच्छता व खड्डे तातडीने दुरुस्त करा!मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकार्‍यांकडे डॉ. गणेश ढवळे यांची निवेदनाद्वारे मागणी
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
बीड शहरातील मूलभूत सुविधांवर ‘तुतारी गट’ आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा

बीड : येथील अमन व्हॉलीबॉल अकॅडमीमध्ये विविध वयोगटातील खेळाडूंच्या गौरवार्थ आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात २१ आणि १८ वर्षांखालील खेळाडूंचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, सर सय्यद अहमद स्कूलचे सचिव शेख अब्दुल वकील, समाजसेवक सय्यद शाकेर, नगरसेवक राहुल गुरखुदे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहम्मद शकील अहमद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी इंदापूर (जि. पुणे) येथे पार पडलेल्या १४ वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून बीडचा गौरव वाढवणाऱ्या शेख खुबेब, अरशान उल्ला पठाण, राज पांडुरंग दराडे, शेख आफी आणि अब्दुल आहाद पठाण या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

खेळाडूंना मार्गदर्शन करताना उपनगराध्यक्ष विनोद रोहिदास मुळूक यांनी शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करण्याचे आवाहन केले. तसेच अकॅडमीच्या मैदानावर आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सत्कार सोहळ्यामुळे बीडमधील तरुण खेळाडूंना भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.

COMMENTS