Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर विजय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास विधानपरिषदेवर निवडून आणू
गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक 3 हजार 29 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकमेकांना पेढा भरवून अभिनंदन देखील केले आहे.


 थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असताना, यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार भाजपा आणि शिंदे गटाने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे दिसत असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतांना दिसून येत आहे. यासंदर्भात बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे. आतापर्यंतचे जे आकडे आलेले आहेत, त्यानुसार 3 हजार 29 एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये मग तो विदर्भ, मराठवाडा असो की, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण असेल सगळीकडे आमची सरशी झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करेन, की या सहा महिन्यांच्या कारभारावर एकप्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे. मी त्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचही अभिनंदन करेन, की त्यांनीही अविरत प्रयत्न करून भाजपाच्या उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी एक वातावरण तयार केलं. त्यामुळे जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते, स्वत: बेकायदेशीर असताना आमच्या सरकारला बेकायदेशीर म्हणत होते, त्यांना न्यायालयाने तर सांगितलेच आहे की आमचे सरकार कायदेशीर आहे. पण आज महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील सांगितले, की हेच कायदेशीर सरकार आहे आणि ही जनता याच सरकारच्या पाठीशी आहे. म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर ः नाना पटोले
राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर त्यांचा दावा खोडून काढत महाविकास आघाडीनेच सर्वाधिक विजय मिळवल्याचा दावा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने 900 पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भाजप विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.


ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू. नागपूर जिल्ह्यात 236 पैकी 200 ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला 36 जागाही मिळाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला असल्याचे पटोले यांनी सांगितले.

COMMENTS