Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण

पंढरपुर प्रतिनिधी - प्रेम विवाहला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीसह तिच्या प्रियकराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरच्या माढा तालुक्यात

अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार: मंत्री उदय सामंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम

पंढरपुर प्रतिनिधी – प्रेम विवाहला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीसह तिच्या प्रियकराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरच्या माढा तालुक्यात घडली आहे. या मारहाणीत वडील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना लेकीनेच प्रियकराच्या मदतीने बेदम मारहाण केल्याच्या घटनेने माढा तालुका हादरुन गेला आहे. साक्षी शहा असे मुलीचे नाव असून महेंद्र शाह असे तिच्या वडिलांचे नाव आहे. साक्षीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता. घटनेच्या दिवशी साक्षी कामानिमित्त पुण्याला गेली होती. पुण्यावरून परत येताना वडील तीला शेटफळ जवळ घ्यायला गेले होते. शेटफळ वरून घरी जात असताना साक्षीने लघुशंका करण्यासाठी वडाचीवाडी येथे गाडी थांबवली. त्यावेळी तिथे दबा धरून बसललेल्या तिच्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने महेंद्र शहा यांना मारहाण केली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची साक्षीने पोलीस ठाण्यास फिर्याद दिली. मात्र साक्षीच्या जबाबातील विसंगती पाहून पोलिसांनी सखोल तपास करून 24 तासाच्या आत साक्षीसह पाच जणांना अटक केली आहे. साक्षी शहा,चैतन्य कांबळे,आतिश लंकेश्वर,रामा पवार,बंडू उर्फ आनंद जाधव ,मयूर चंदनशिवे असे अटक केलेले आरोपींची नावे आहेत. या संतापजनक घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

COMMENTS