Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवीण तरडेंनी केली ‘धर्मवीर 2’ची घोषणा

सीक्वेलमधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’

मुंबई प्रतिनिधी - मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर श

केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी ; ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय होत नसल्याने उद्योजक नाराज
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल | ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | LokNews24
वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

मुंबई प्रतिनिधी – मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मवीर 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच निर्माते मंगेश देसाई आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देवस्थान जेजुरी येथे या सिनेमाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे प्रवीण तरडे यांनी गेले दोन महिने या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मेहनत घेतली आहे. मे 2022 मध्ये प्रदर्शित झालेंल्या धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची कथा होती धर्मवीर 2 चित्रपटात कोणते धक्कादायक खुलासे – गौप्यस्फोट असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागंलं आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचं दिसत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता.  त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

COMMENTS