Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अंदमानात मान्सूनचे आगमन; केरळात लवकर पोहोचण्याची चिन्हे

मुंबई : देशभरात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृत प्रवेश

मान्सूनची आनंदवार्ता; केरळमध्ये दाखल! पुढील सात दिवस विविध राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
अंदमानात मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता
अंदमानात मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता – Lokmanthan |  लोकमंथन

मुंबई : देशभरात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृत प्रवेश करत अंदमान-निकोबार बेटांपर्यंत मजल मारली आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अंदमान परिसरात पश्चिमेकडील वारे ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वाहत आहेत. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पुढील तीन ते चार दिवसांत त्याची प्रगती अधिक वेगाने होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही मान्सूनची स्थिती अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

यंदा मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पोहोचणारा मान्सून यंदा २६ मेच्या आसपास किनारपट्टी गाठू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने मान्सूनच्या वेगात वाढ झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

विशेष म्हणजे, मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता कमी असून त्याची वाटचाल सुरळीत राहील, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर ६ जूनपर्यंत कोकण किनारपट्टी आणि ७ जूनपर्यंत पुणे परिसरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. दरम्यान, ईशान्य भारतासह दक्षिणेकडील काही राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटक येथे पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

COMMENTS