Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या 22 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागा

मोठा भाऊ घरी नसताना दिराने वहिनीचा गळा चिरल | LOKNews24
पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव : राज्यपाल रमेश बैस
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या 22 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केले असून पश्‍चिम महाराष्ट्रातही वरुणराजाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता हवामान खात्याकडून आजपासून दोन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोव्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी राज्यातील पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्या म्हणाल्या की, पुढील काही दिवस मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या काही भागांमधील तापमानात वाढ होऊ शकते. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय अरबी समुद्रातून येणार्‍या वार्‍यांचा वेग सातत्याने वाढत असल्याने महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भासह पश्‍चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत पुणे शहर तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात हलका ते अतिहलका प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

COMMENTS