Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रियंका चोप्राचे दीर जाऊ सोफी टर्नर-जो जोनास घटस्फोट घेणार ?

 काही बातम्या अशा असतात ज्या एका रात्रीत व्हायरल होतात. सध्या असंच काहीसं देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या दीर आणि वहिनीसोबत घडत आहे. हॉलिवूडची लोकप

सांगली जिल्ह्यात भरधाव कार रसवंतीगृहात घुसून एका शाळकरी मुलाचा मृत्यू
अडीच कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, 21 जणांना अटक
तिघा मित्रांनी मिळून केली युवकाची चाकू भोकसून हत्या I LOKNews24

 काही बातम्या अशा असतात ज्या एका रात्रीत व्हायरल होतात. सध्या असंच काहीसं देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या दीर आणि वहिनीसोबत घडत आहे. हॉलिवूडची लोकप्रिय जोडी अभिनेत्री सोफी टर्नर आणि गायिका जोई जोनास वेगळे होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. या दोघांमध्ये काही ठीक चाललं नसल्याचा दावा केला जात आहे, मात्र याच दरम्यान जोई जोनासचा एक फोटो समोर आला आहे ज्याने सर्व रिपोर्ट्स खोटे ठरविले आहेत.प्रियांका चोप्राप्रमाणेच लोकांना तिच्या दिरीची बायको खूप आवडते. एका कार्यक्रमात जोईची एंगेजमेंट रिंग दिसली नाही तेव्हा त्यांच्या खराब नात्याची चर्चा सुरू झाली अशी चर्चा होती, अशा परिस्थितीत लोकांना वाटलं की, या कपलमध्ये काहीतरी गडबड होत आहे. आता अफवांची प्रक्रिया सुरू होती की, निक जोनासचा भाऊ लग्नात अंगठी घालताना दिसला.जो जोनासची हे फोटो पाहिल्यानंतर लोकांना खात्री पटली की, हे कपल एकमेकांपासून वेगळे होत नाहीयेत. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करत लिहिलं, ‘कदाचित ते घटस्फोट घेणार नाहीत.’ तर दुसर्‍या युजरने लिहिलं आहे की, ”त्यांनी खरोखरच एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत. त्यांचं लग्न खूप सक्सेसफुल आहे. असं म्हणल्यास ते वावगं ठरणार नाही. यापूर्वी, जोनास ब्रदर्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जो जोनास, केविन जोनास आणि निक जोनास यांचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोत जो जोनास तिच्या लग्नाची अंगठी घातलेली दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्याजवळ त्याचा हात आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने असं लिहिलं आहे की,  “सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा, हा दौरा आतापर्यंत अविश्वसनीय राहिला आहे! काल एक मोठ्या टेक्सास ऑस्टिन शोच्या आधी आज रात्री टेक्सास सनसेटमध्ये फॅमिलीसोबत थोडा वेळ घालवला.  आम्ही तुम्हाला सांगतो की, सोफी टर्नर आणि जोई जोनास गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत आणि दोघांच्या लग्नाला फक्त 4 वर्षे झाली आहेत. या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने दावा केला आहे की, जोनास त्याचं लग्न आणि सोफीसोबतचे नातेसंबंध संपवण्याबाबत सल्ला घेण्यासाठी वकिलांना भेटत आहे.

COMMENTS