Homeताज्या बातम्यादेश

अखेर राजधानीतील प्रदूषण घटले

14 दिवसांनंतर बांधकामावरील बंदी उठवली आजपासून होणार शाळा सुरू

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले होते, त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये फटाक्यांची होणार्‍या आतष

ऊपोषणास बसलेल्या २२ ऊपोषणकर्त्या पैकी 11 जणांची प्रकृती खालावली (Video)
कोरोना वाढतोय, मास्क वापरा – मुख्यमंत्री
पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले होते, त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये फटाक्यांची होणार्‍या आतषबाजीमुळे प्रदूषण धोक्याच्या श्रेणीत पोहचले होते. मात्र त्यानंतर पडलेल्या पावसामुळे प्रदूषण घटतांना दिसून येत आहे. रविवारी सकाळी 7 वाजता शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 290 होता. शनिवारी 319, शुक्रवारी 405 आणि गुरुवारी 419 नोंद झाली. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळत आहे.
हवेची गुणवत्ता सुधारत असल्यामुळे दिल्ली सरकारने लावलेले निर्बंध 14 दिवसांनंतर हटवण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे 5 नोव्हेंबरपासून निर्बंध लावण्यात आले होते. मात्र हे निर्बंध उठवल्यामुळे आता राजधानीतील बांधकाम आणि ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे. दुसरीकडे, दिल्लीत सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होत आहेत. प्रदूषणामुळे सरकारने 8 नोव्हेंबर रोजी शाळांना 10 दिवसांची हिवाळी सुट्टी जाहीर केली होती.दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचे पाहून दिल्लीचे पर्यावरण मंत्री आणि आप नेते गोपाल राय म्हणाले – गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सुधारली आहे. त्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत, परंतु मी दिल्लीतील लोकांना सतर्क राहण्याची विनंती करतो. ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे, बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल वाहनांवरील बंदी अजूनही लागू आहे. राय पुढे म्हणाले की, दिवाळीपूर्वी पावसाने दिलासा दिला होता, पण सणासुदीच्या दिवशी लोकांनी पुन्हा फटाके फोडून हवा खराब केली. मात्र, आता हवेत थोडी सुधारणा झाली आहे. या दरम्यान सर्वांनीच खबरदारी घ्यावी. दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ झाल्यामुळे दिल्ली सरकारने लोकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे आणि शारीरिक व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली आरोग्य विभागाने 11 नोव्हेंबर रोजी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये लोकांना फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय लोकांना डासांपासून बचाव करणारी कॉइल किंवा अगरबत्ती जाळू नये, असेही सांगण्यात आले.दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केजरीवाल सरकारने 21-22 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच दिल्लीत कृत्रिम पावसाची योजना तयार केली आहे. यासाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी 8 नोव्हेंबर रोजी आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांसोबत बैठक घेतली होती.

सम-विषयचा निर्णय स्थगित – वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सम-विषम योजनेवर बंदी घातली आहे. जी दिल्लीत दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 13 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत लागू होणार होती. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी 10 नोव्हेंबर रोजी सांगितले की, पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे. दिवाळीनंतर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला जाईल. हवेची स्थिती बिघडल्यास, सम-विषम योजना सुरू करता येईल.

COMMENTS