Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्येच होणार

मुंबई ः मेट्रो कारशेडसंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या वादानंतर राज्य सरकारने मेट्रो 6 साठी कांजूरमार्ग येथे कारशेड बां

मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरा पेट्या बसवणार
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करावीतउपमुख्यमंत्री शिंदे : चेंबूरच्या श्री नारायण गुरू महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
दंत चिकित्सा शिबीराचा 51 रुग्नानी घेतला लाभ

मुंबई ः मेट्रो कारशेडसंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या वादानंतर राज्य सरकारने मेट्रो 6 साठी कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 506 कोटींची निविदा काढली आहे. महाविकास आघाडी सरकारने ज्यावेळी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ही जागा नेमकी राज्य सरकारची की केंद्र सरकारची यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र आता कांजूरमार्ग कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीएने स्टॅबलिंग यार्ड, डेपो कंट्रोल सेंटर, कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, मेंटेनन्स आणि वर्कशॉप बिल्डिंग आणि सबस्टेशनच्या उभारणीसाठी निविदा काढली आहे.

COMMENTS