Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायतीत प्रा.सतीश पाटील गटनेतेपदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; १५ पैकी ११ नगरसेवकांचा पाठिंबा

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाच्या वादावर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने 7 मे रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत, प्रा.सतीश उद्धवराव पाटील यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. पाटील यांना 15 पैकी 11 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विद्यमान गटनेते संतोष मेहत्रे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून नगरपंचायतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. प्राध्यापक सतीश पाटील हेच किंगमेकर खऱ्या अर्थाने ठरले आहेत. पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची सभा घेऊन गटनेता बदलाचा प्रस्ताव प्रा.सतीश पाटील यांच्या बाजूने मंजूर करण्यात आला होता. व जिल्हाधिकारी यांच्याकडे तसा प्रस्ताव 24 एप्रिल रोजी दाखल करण्यात आला होता.  या निर्णयाला गटनेते व विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल केला होता. यावर सुनावणी देखील झाली होती दरम्यान जिल्हाधिकारी यांनी  दिनांक सात रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गटनेते संतोष मेहत्रे यांना बैठक बोलून बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते. मात्र त्यांना बहुमत दाखवता आले नाही. त्यांच्यासोबत अवघे चार नगरसेवक आहे.   दोन्ही बाजूंची कागदपत्रे, गटनोंदणी, सदस्यांचे बहुमत आणि नियमांचा अभ्यास केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने गटनेते संतोष मेहत्रे यांचे सर्व अपील फेटाळून लावत, प्रा.सतीश पाटील यांच्याकडे गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला. या संपूर्ण राजकीय घडामोडीत माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व माजी नगराध्यक्ष उषा राऊत यांची भूमिका विशेष चर्चेत राहिली. गटबांधणी, सदस्यांशी समन्वय तसेच पक्षांतर्गत हालचालींमध्ये राऊत कुटुंबाने महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. विशेषतः बहुमत एकत्र ठेवण्यासाठी पडद्यामागून झालेल्या हालचालींमध्ये त्यांचा प्रभाव दिसून आल्याचे बोलले जात आहे.विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.  प्रा. राम शिंदे यांनी कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये सत्ता समीकरण बदलण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सतीश पाटील यांनी नगरसेवकांची बैठक बोलावून गटनेते व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव बहुमताने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. या पुढील काळामध्ये देखील प्राध्यापक राम शिंदे यांचीच भूमिका नगरपंचायत मध्ये महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यांच्याच अनुमतीने आणि सहमतीने पुढील राजकीय घडामोडी घडणार आहे. असे नवनिर्वाचित गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांनी सांगितले.  निर्णयपत्रात नमूद केल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातील बहुसंख्य सदस्यांनी सतीश पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. गटाच्या बैठकीत झालेला ठराव आणि त्यानंतरची प्रक्रिया वैधानिक चौकटीत झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतोष मेहत्रे यांनी केलेले आक्षेप ग्राह्य धरले गेले नाहीत.

अ‍ॅड. संदीप वर्पे यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर वर्णी
बसस्थानक उभारणीत नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष; आ. आशुतोष काळे ; काँक्रिटीकरण कामास प्रारंभ 
कोरेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत फाळके गटाची बाजी

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाच्या वादावर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने 7 मे रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत, प्रा.सतीश उद्धवराव पाटील यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. पाटील यांना 15 पैकी 11 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विद्यमान गटनेते संतोष मेहत्रे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून नगरपंचायतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. प्राध्यापक सतीश पाटील हेच किंगमेकर खऱ्या अर्थाने ठरले आहेत. पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची सभा घेऊन गटनेता बदलाचा प्रस्ताव प्रा.सतीश पाटील यांच्या बाजूने मंजूर करण्यात आला होता. व जिल्हाधिकारी यांच्याकडे तसा प्रस्ताव 24 एप्रिल रोजी दाखल करण्यात आला होता.

 या निर्णयाला गटनेते व विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल केला होता. यावर सुनावणी देखील झाली होती दरम्यान जिल्हाधिकारी यांनी  दिनांक सात रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गटनेते संतोष मेहत्रे यांना बैठक बोलून बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते. मात्र त्यांना बहुमत दाखवता आले नाही. त्यांच्यासोबत अवघे चार नगरसेवक आहे.

  दोन्ही बाजूंची कागदपत्रे, गटनोंदणी, सदस्यांचे बहुमत आणि नियमांचा अभ्यास केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने गटनेते संतोष मेहत्रे यांचे सर्व अपील फेटाळून लावत, प्रा.सतीश पाटील यांच्याकडे गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला.

या संपूर्ण राजकीय घडामोडीत माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व माजी नगराध्यक्ष उषा राऊत यांची भूमिका विशेष चर्चेत राहिली. गटबांधणी, सदस्यांशी समन्वय तसेच पक्षांतर्गत हालचालींमध्ये राऊत कुटुंबाने महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. विशेषतः बहुमत एकत्र ठेवण्यासाठी पडद्यामागून झालेल्या हालचालींमध्ये त्यांचा प्रभाव दिसून आल्याचे बोलले जात आहे.विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

 प्रा. राम शिंदे यांनी कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये सत्ता समीकरण बदलण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सतीश पाटील यांनी नगरसेवकांची बैठक बोलावून गटनेते व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव बहुमताने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. या पुढील काळामध्ये देखील प्राध्यापक राम शिंदे यांचीच भूमिका नगरपंचायत मध्ये महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यांच्याच अनुमतीने आणि सहमतीने पुढील राजकीय घडामोडी घडणार आहे. असे नवनिर्वाचित गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांनी सांगितले.

 निर्णयपत्रात नमूद केल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातील बहुसंख्य सदस्यांनी सतीश पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. गटाच्या बैठकीत झालेला ठराव आणि त्यानंतरची प्रक्रिया वैधानिक चौकटीत झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतोष मेहत्रे यांनी केलेले आक्षेप ग्राह्य धरले गेले नाहीत.

COMMENTS