Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूजल समृध्द ग्रामस्पर्धेत जिल्ह्यात किरकसाल प्रथम

सातारा / प्रतिनिधी : अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व

सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी वेतनापासून वंचित
मसूर-उंब्रज परिसरात 42 लाखाला गंडा घालणारे दोघेजण ताब्यात
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती विक्रीस मनाई; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने मुर्तीकारागिर हतबल

सातारा / प्रतिनिधी : अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्‍वत राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी गावा-गावांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उदिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दि. 9 मार्च, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अटल भूजल योजनेंतर्गत भुजल समृध्द ग्रामस्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणार्‍या व काम करणार्‍या ग्रामपंचायतींना सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीकरीता सन 2022-23 साठी भूजल समृध्द ग्रामस्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. या स्पर्धेमधील ठळक बाबी, सन 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या 13 जिल्ह्यातील 270 ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एकूण 550 गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सातारा जिल्हास्तरावर माण तालुक्यातील किरकसाल ग्रामपंचायत प्रथम तर खटाव तालुक्यातील निढळ ग्रामपंचायत द्वितीय आणि मांडवे ग्रामपंचायत तृतीय क्रमांक आला.
प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस 50 लाख, द्वितीय क्रमांक 30 लाख व तृतीय क्रमांक पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस 20 लाखाचे बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सातारा यांनी कळविले आहे.

COMMENTS