Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निराधार महिलेला मिळाला निवारा; पाथर्डीत नगराध्यक्षांच्या पुढाकारातून उभारले छोटे घर

पाथर्डी : शहरातील चिंचपूर रोड परिसरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असलेल्या बेबीबाई शेटे या निराधार महिलेला अखेर छोटासा तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर आणि शहनवाज शेख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.बेबीबाई शेटे या गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोणताही ठोस निवारा नसताना अत्यंत हालअपेष्टा सहन करत जीवन जगत होत्या. त्यांची ही दयनीय अवस्था पाहून अण्णा हरेर व शहनवाज शेख यांनी मदतीचा हात पुढे केला. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या सहकार्याने विविध नागरिकांनी सहकार्य करत लोकवर्गणी गोळा करून या महिलेसाठी पत्र्याची छोटी टपरी उभारण्यात आली आहे. या छोट्याशा तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये दैनंदिन लागणाऱ्या वस्तूही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कपडे, भांडी, किराणा साहित्य अशा आवश्यक वस्तूंचा यात समावेश आहे.या उपक्रमामुळे बेबीबाई शेटे यांना सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली असून त्यांच्या जीवनाला दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या कार्यातून समाजातील माणुसकीचे दर्शन घडले असून, गरजूंसाठी लोकसहभागातून मदतीचा आदर्श निर्माण झाल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

धरणात बुडून युवकाचा मृत्यू
शेवगाव तालुक्यातील नागलवाडीमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा; शस्त्रांचा धाक; 55 तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास
एलपीजी गॅसवरून संसदेत खडाजंगी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये तीव्र वाद, राज्यसभेचे वातावरण तापले

पाथर्डी : शहरातील चिंचपूर रोड परिसरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असलेल्या बेबीबाई शेटे या निराधार महिलेला अखेर छोटासा तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर आणि शहनवाज शेख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.बेबीबाई शेटे या गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोणताही ठोस निवारा नसताना अत्यंत हालअपेष्टा सहन करत जीवन जगत होत्या. त्यांची ही दयनीय अवस्था पाहून अण्णा हरेर व शहनवाज शेख यांनी मदतीचा हात पुढे केला.

नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या सहकार्याने विविध नागरिकांनी सहकार्य करत लोकवर्गणी गोळा करून या महिलेसाठी पत्र्याची छोटी टपरी उभारण्यात आली आहे. या छोट्याशा तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये दैनंदिन लागणाऱ्या वस्तूही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कपडे, भांडी, किराणा साहित्य अशा आवश्यक वस्तूंचा यात समावेश आहे.या उपक्रमामुळे बेबीबाई शेटे यांना सुरक्षिततेची जाणीव निर्माण झाली असून त्यांच्या जीवनाला दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या कार्यातून समाजातील माणुसकीचे दर्शन घडले असून, गरजूंसाठी लोकसहभागातून मदतीचा आदर्श निर्माण झाल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS